शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

लातूरमध्ये २०१४ च्या निवडणुकीत १३ हजार मतदारांनी दिली ‘नोटा’ला पसंती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:26 IST

लातूर लोकसभेच्या निवडणुकीत २०१४ मध्ये तब्बल १८ जणांनी निवडणूक लढविली.

लातूर : निवडणूक आयोगाने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदारांना ‘नोटा’चा अधिकार दिला. पूर्वी मतदान केंद्रात गेल्यावर कोण्या तरी एका उमेदवाराला मत देणे आवश्यक होते. तुम्हाला उमेदवार पसंत असो की नसो, त्यासाठी वेगळा कुठला पर्याय नव्हता. मागील लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवारापेक्षा ‘नोटा’ला १३ हजार ३९६ मतदारांनी पसंती दर्शविली आहे. 

निवडणुकीत उमेदवार कितीही असले तरी यापैकी कोणाला तरी एकालाच पसंती द्यावी लागते. पूर्वी जेवढ्या उमेदवारांचे नाव मतपत्रिकेवर आहे, त्यापैकी एकाला मतदान द्यावे लागत होते. आता ‘नोटा’चे बटण नव्या मतदान यंत्रावर २०१४ मध्ये पहिल्यांदा आले. मतदारांना एकही उमेदवार पसंत नसेल तर तो मतदार ‘नोटा’चे बटण दाबून आपला हक्क बजावू शकतो. लातूर लोकसभेच्या निवडणुकीत २०१४ मध्ये तब्बल १८ जणांनी निवडणूक लढविली. यात भाजपा, काँग्रेस, बसपा, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी या राजकीय पक्षांसह अपक्षांचा समावेश होता. भाजपाचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांनी काँग्रेस उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला होता. निवडणुकीची चुरस या दोघांमध्येच रंगली होती. आजही काँग्रेस अन् भाजपातच चुरशीची लढत होणार आहे. बसपाचे उमेदवार दीपक कांबळे यांना २० हजार २९ तर आम आदमी पार्टीचे दीपरत्न निलंगेकर यांना ९ हजार ८२९ मते मिळाली होती. उर्वरित अपक्षांमध्ये सर्वाधिक मते सुधीर शिंदे यांना ८ हजार ६७८ होती. इतर उमेदवारांना मात्र ५ हजारांचा पल्लाही गाठता आला नाही.  सर्वात कमी मते मिलिंद कांबळे (९४२) यांना होती. 

१८ जणांनी लढविली होती निवडणूक१८ उमेदवारांचे नाव व त्यांचे चिन्ह नव्या मतदान यंत्रावर होते. त्यात एक बटण ‘नोटा’साठी देण्यात आले होते. २०१४ च्या या निवडणुकीत एक-दोन नव्हे तर तब्बल १३ हजार ३९६ मतदारांना यातील एकही उमेदवार योग्य वाटला नाही. या मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबून आपला अधिकार बजावला. लोकसभेच्या रणसंग्रामात भाजपाने बाजी मारली. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, भाजपाचा सामना आता चांगलाच रंगत आहे. त्यामुळे मतदानानंतर कोणाची सरशी, कोणाची पिछाडी हे स्पष्ट होईल. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlatur-pcलातूरPoliticsराजकारण