शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

शहीद जवान संभाजी केंद्रे यांना अखेरचा निरोप

By हरी मोकाशे | Updated: July 16, 2023 20:57 IST

हवेत बंदुकीच्या फैरी झाडून पोलिस दलाने दिली मानवंदना

लातूर : सैन्य दलात कार्यरत असलेले केंद्रेवाडी (ता. चाकूर) जवान संभाजी केंद्रे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्यावर असताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी केंद्रेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येऊन अखेरचा निरोप देण्यात आला. १४ वर्षीय मुलगा आर्यन याने पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

चाकूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील संभाजी हरिबा केंद्रे (३८) हे सन २००४ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते. १७ वर्षांपासून त्यांनी नायक पदावर जम्मू कश्मीर, श्रीनगर, भोपाळ, अहमदनगर येथे कार्य केले. सध्या ते अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत होते. कर्तव्यावर असताना गुरुवारी त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी केंद्रेवाडी येथे आणण्यात आले. दरम्यान, रायवाडी मोड ते केंद्रेवाडीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. पंचक्रोशीतील नागरिकांनी वीर नायक केंद्रे यांचे दर्शन घेत वीर नायक केंद्रे अमर रहे, अशा घोषणा दिल्या. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सहायक पोलिस निरीक्षक खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अखेरचा निराेप देण्यात आला.

वीर नायक केंद्रे अमर रहे...वीर नायक केंद्रे अमर रहे... अशा घोषणा देत संभाजी केंद्रे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेण्यात आले. यावेळी खा. सुधाकर शृंगारे, आ. बाबासाहेब पाटील, माजी आ. विनायकराव पाटील, दिलीपराव देशमुख, तहसीलदार रेणुकादास देवणीकर, जिल्हा सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल शरद पांढरे, सुभेदार वेदपाठक, भारतीय माजी सैनिक संघटनेचे कॅप्टन कृष्णा गिरी, विलास सूर्यवंशी, सुभेदार रमेश घुले, हवालदार बोकळे, नायब तहसीलदार डिगंबर स्वामी, तलाठी विष्णू वजिरे, शंकर लांडगे, सावित्राताई केदार, सोसायटीचे व्हा. चेअरमन प्रतीक केदार आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले.

टॅग्स :laturलातूर