शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लसीसाठी मोठी सुई; वेस्टेजमुळे पळता भुई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून एडी सिरिंजचा पुरवठा मागणी प्रमाणे होत नाही. त्यामुळे बालकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणा-या सिरिंज वापर कोरोना ...

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून एडी सिरिंजचा पुरवठा मागणी प्रमाणे होत नाही. त्यामुळे बालकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणा-या सिरिंज वापर कोरोना लसीकरणासाठी केला जात आहे. जिल्ह्यात १०,००० ते १२,००० एडी सिरींजची गरज आहे. त्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून मिळालेल्या मिळालेल्या पत्रानुसार अन्य सिरिंजचा वापर करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडे एडी सिरिंज वगळता अन्य सिरिंज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. लसीकरण थांबणार नाही या अनुषंगाने काळजी घेतली जात आहे. चार-पाच दिवसांपासून सिरीजचा तुटवडा असला तरी लसीकरणाला ब्रेक येऊ दिला नाही. ९ सप्टेंबर रोजी तर जिल्ह्यात विक्रमी लसीकरण करण्यात आले आहे.

काय आहे एडी सिरींज ?

एडी सिरिंज .५ लाॅक होते. सिरींजमध्ये लस घेतल्यानंतर आपोआप लॉक होण्याची सिस्टीम आहे. अन्य सीरिंजमध्ये ही सोय नाही. एडी सिरिंजमुळे वेस्टेज होण्याची शक्यताही फार कमी आहे.

२ सीसी सिरीज कशी असते?

२ सी सी सिरिंजमध्ये लस एक एम.एल. दोन एम.एल. घेता येते. त्यावर मार्किंग असते. मार्किंगनुसार लस घ्यायची असते. ५ एम.एल. लस काळजीपूर्वक घ्यावी लागते. या सिरींजमध्ये लॉकची सोय नाही. यात मार्किंगनुसार लस घ्यावी लागते.

१२ हजार एडी सिरिंज लागतात

कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यात दररोज १२००० सिरींजची गरज लागते. या सिरिंजचा पुरवठा गेल्या चार पाच दिवसापासून कमी झाला आहे.चार पाच हजाराच्या आसपास सिरिंज प्राप्त होत आहेत. मागणी तसा पुरवठा होत नाही म्हणून अडचण आहे.

वेस्टेज वाढले....

आपोआप ०.५ एम एल लस घेणारी सिरिंज उपलब्ध नसल्याने लस वेस्टजचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परंतु सध्या वेस्टचे प्रमाण मायनस आहे. खबरदारी घेऊन नागरिकांना लस दिली जात आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांचा कोट...

पुरवठा थोडा कमी झाला आहे.परंतु लसीकरणाला काहीच अडचण नाही. अन्य सिरिंज उपलब्ध आहेत.त्यामुळे अडचण नाही. सीरिंजमध्ये लस घेताना काळजी घ्यावी लागते, एवढेच काम वाढले आहे. बाकी काहीच अडचण नाही. आपल्या जिल्ह्याचे वेस्टेजचे प्रमाणही नगण्य आहे.

डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी, लातूर