लातूर शहरालगत असलेल्या हद्दीत एक प्लाॅट दाेघांचा, तिघांच्या नावे करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. याबाबत संबंधित पाेलीस ठाण्यात मूळ मालकांनी तक्रारी केल्या आहेत. काही प्रकरणात हाणामारीच्या घटना घडल्या असून, परस्परविराेधी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. प्लाॅट अथवा जमिनीचे वाद साेडविण्यासाठी ठाणे स्तरावर प्रयत्न केले जातात. मात्र, बहुतांश प्रकरणे महसूल विभाग किंवा दिवाणी न्यायालयाच्या कक्षेतील असतात. त्यासाठी पाेलीस यंत्रणा फारसा हस्तक्षेप करत नाही. कागदपत्रांची पडताळणी आणि चर्चेतून पाेलीस वाद-तंटा मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मालमत्तेवर दाेन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे सांगितले जातात. अशा वेळी महसूल किंवा वकिलांचा सल्ला घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. काही प्रकरणे अद्यापही चाैकशीच्या फेऱ्यात अडकली आहेत.
तक्रारींची पाेलीस दलाकडून चाैकशी...
भूमाफिया विराेधातील अनेक तक्रारीत पाेलीस विभागाच्यावतीने दखल घेत प्राथमिक चाैकशी करण्यात आली आहे.
यातील काही प्रकरणात पाेलीस ठाण्यांच्या स्तरावर ताेडगा काढण्यात यश आले आहे. तर काही प्रकरणात चाैकशी सुरु आहे. बहुतांश प्रकरणांची सुनावणी न्यायालयात सुरु आहे़
प्लाॅट, जमीन हडप करण्याच्या घटनांना आवर घालण्यासाठी पाेलीस विभागाच्या वतीने भूमाफियांवर कठाेर कारवाई हाेण्याची गरज आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लाॅट बळकाविण्याच्या घटना अलीकडे वाढत आहेत.
पाेलीसांची माेहीम...
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत प्लाॅट आणि शेत-जमिनीबाबतचा तंटा साेडविण्यासाठी त्या-त्या ठाण्यांच्या स्तरावर स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. आठवड्यातील शनिवार हा या वाद-तंट्याच्या सुनावणीसाठी ठेवण्यात आला आहे. स्थळपंचनामा करून वाद मिटविण्याचा प्रयत्न पाेलीस करत आहेत.
बळाचा वापर करून प्लाॅट हडपण्याचे प्रयत्न...
किनी येथे माझा वडिलाेपार्जित प्लाॅट आहे. मात्र, काही लाेकांनी हा प्लाॅट बळकाविण्याचा प्रयत्न केला असून, मी या प्रकाराला कडाडून विराेध केला आहे. माझ्या प्लाॅटची मूळ कागदपत्रे काढून ठेवली आहेत. याबाबत उदगीर येथील तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. काही राजकीय लाेकांना हाताशी धरून माझा प्लाॅट हडपण्याचा प्रयत्न हाेत आहे.
- साहेबराव निकाळजे
महामार्गालगत माझी वडिलाेपार्जित शेती आहे़ शहराच्या विस्तारीकरणामुळे या शेतीचा भाव गगनाला गेला आहे. या शेतीवर डाेळा ठेवत काही लाेकांनी कब्जा करण्याचा प्रयत्न केला हाेता. याबाबत मी पाेलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. शिवाय, भूमिअभिलेख कार्यालय, तहसीलदार, पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता सध्याला हे प्रकरण दिवाणी न्यायालयात सुुरू आहे.
- अमन लातूरकर