लातूर शहरासह जिल्ह्यात एकूण १२ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा याेजनेंतर्गत एनसीसीमध्ये जवळपास २०० मुलींना प्रशिक्षण दिले जाते. यातून आता एनडीए, आयएमए आणि ओटीए या तीन माध्यमांद्वारे लष्करात दाखल हाेता येणार आहे. सावित्रीच्या लेकींना आता सीमेवर शत्रूविराेधात लढा देता येणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाने या लेकींना माेठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल...
सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले आहे. आता राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी अर्थात एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींना देता येणार आहे. यातून स्थानिक एनसीसीमधील मुलींना आता देशसेवेची संधी मिळणार आहे.
प्रत्येक क्षेत्रात मुलींनाही समान संधी देण्यात आली आहे. याला अपवाद एनडीए हाेते. मात्र, सर्वाेच्च न्यायालयाने एनडीएची दारेही आपल्या निकालाने खुली केली आहेत. हा निकाल देशभरातील लाखाे मुलींसाठी दिलासादायक ठरला आहे.
लातूर जिल्ह्यातील २०० मुलींना मिळेल संधी
लातूर शहर आणि जिल्ह्यातील १२ महाविद्यालयात एनसीसी कॅम्प घेतले जातात. यातून जवळपास २०० मुली प्रशिक्षण घेतात. आता या मुलींना सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने एनडीए, आयएमए आणि ओटीए या तीन माध्यमांद्वारे लष्करात भरती हाेता येणार आहे.
लष्करामध्येही मिळणार प्रवेश...
देशाच्या सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने देशभरातील लाखाे मुलींना लष्करात भरती हाेण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी, आयएमए आणि ओटीएसरख्या विभागात भरती हाेता येईल. यातून देशसेवा करण्याची संधी आता मुलींना मिळेल.
लेकींनी मानले न्यायालयाचे आभार...
हा निर्णय मुलींसाठी वेगळ्या क्षेत्रात संधी देणारा ठरणार आहे. आजपर्यंत या क्षेत्राची दारे मुलींसाठी बंद हाेती. आता या निकालामुळे एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींना देता येणार आहे. या क्षेत्रात मुली आपले कर्तृत्व सिद्ध करतील. हा विश्वास वाटताे.
सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशभरातील मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीत भरती हाेण्याची संधी मिळणार आहे. यातून आता मुलींना देशसेवा करता येणार आहे. परिणामी, एनसीसीच्या मुलींना निकालातून दिलासा मिळाला आहे.
देशासह जगभरातील विविध क्षेत्रात मुली आज आघाडीवर आहेत. विज्ञान, समाजकारण, राजकारण, शिक्षण आणि संशाेधनाच्या क्षेत्रात मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने मुलींनाही एनडीएमध्ये प्रवेश मिळणार आहे. हा निर्णय महत्वाचा आहे.