आ. बाबासाहेब पाटील यांनी गांजूर येथे भेट देवून आढावा घेतला. पशू विभागाने मृत जनावरांचे पंचनामे करावेत. पशुपालकास आर्थिक मदत करावी. रोगप्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गांजूर येथील मुस्तफा शेख यांची बैलजोडी, भाऊसाहेब पुंडलिक शिंदे यांची गाय दगावली आहे. त्यांचा एक गोऱ्हा आजारी आहे. तर बाबुराव महापुरे यांचा एक बैल दगावला आहे. प्रशांत शिंदे यांची एक म्हैस, बाबूराव सोमवंशी यांचा एक बैल, अण्णासाहेब काळे यांची एक गाय, शिवाजी शिंदे यांचे दोन बैल, राजकुमार शिंदे यांची म्हैस आणि एक वगार, प्रकाश शिंदे यांची गाय, जगनाथ शिंदे यांची म्हैस आणि शेळी दगावली आहे. गावातील अन्य अकरा जनावरे या आजाराने त्रस्त आहेत. तर गांजूरवाडी येथील गोविंद शिंदे यांचा एक बैल मरण पावला आहे. आ. बाबासाहेब पाटील यांनी रविवारी गांजूर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पशुपालकांशी संवाद साधला. यावेळी जि. प. सदस्य माधव जाधव, अनिल वाडकर, लालासाहेब शिंदे, नाना शिंदे, सचिन तोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
गांजुरात ज्ञात रोगाने ९ जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST