केशरबाई भार्गव विद्यालयात उपक्रम
लातूर : शहरातील केशरबाई भार्गव प्राथमिक विद्यालयात मंगळवारी नवीन शैक्षणिक वर्षारंभ दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरस्वती प्रतिमा पूजन करून शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका सुनीता रणदिवे, रुक्मिणी सलगरे, सुनीता हुच्चे, सुनीता कुलकर्णी, अंजना फुले, कल्पना भट्टड, प्रियंका जमादार, सरिता मोरे आदींसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
सूर्यकांत लोखंडे यांचा भाडगाव येथे सत्कार
लातूर : भाडगाव येथे कल्पना चावला व हिरकणी महिला बचत गटाच्या वतीने कृषी पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल सूर्यकांत लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी सहायक पुरी, रामदास काळे, आशिष निरुडे, त्र्यंबक गवळे, सुनीलकुमार डोपे, धीरज भामरे, गोविंद डोपे, कोंडिबा माने, तुकाराम बसपुरे, अभिमन्यू डोपे, धीरज भामरे, काकासाहेब डोपे, लहुजी चामे, संजय मोरे, आदींची उपस्थिती होती. दरम्यान, आगामी काळात कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूर्यकांत लोखंडे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.