शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Killari Earthquake : पुनर्वसनात भारतीय जैन संघटनेचे योगदान, १२०० मुलांच्या जीवनाला दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:25 IST

सारे काही संपले, असे आयुष्य ज्यांच्या वाट्याला आले त्यांनीही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून भरारी घेतली. पोरकेपण आलेल्या मुलांना जणू कुटुंबाचे छत्रच भारतीय जैन संघटनेने दिले.

सूर्यकांत बाळापुरे 

किल्लारी (जि़  उस्मानाबाद): प्रलयंकारी भूकंपानंतर लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यांतील हजारो मुले बेघर झाली. कोणाचे वडील गेले, तर कोणाची आई. तर अनेक जणांचे पालकत्वच हिरावले गेले. अशाच १२०० मुलांसमोर भारतीय जैन संघटनेने मदतीचा हात पुढे केला. 

सारे काही संपले, असे आयुष्य ज्यांच्या वाट्याला आले त्यांनीही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून भरारी घेतली. पोरकेपण आलेल्या मुलांना जणू कुटुंबाचे छत्रच भारतीय जैन संघटनेने दिले. आज त्यातील अनेकांनी आपले आयुष्य कर्तृत्वाने फुलविले आहे. कोणी संशोधक आहे, कोणी प्राध्यापक झाले आहे, तर कोणी कृषी क्षेत्रात, व्यवसायात स्थिरावले आहे. भूकंपानंतर अनेक संस्था मदतीसाठी धावल्या होत्या. त्यातीलच भारतीय जैन संघटनाही पुढे आली होती. मुलांच्या भवितव्याचा विचार करून ज्यांची इच्छा आहे, त्या सर्वांच्या शिक्षणाची सोय केली.  भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलाल मुथा, ‘आपलं घर’चे पन्नालाल सुराणा यांच्यासह कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला. 

आपलं घर आणि एसओएस बालग्राम... च्एसओएस बालग्राम संस्थेनेही अनाथ मुलांना दत्तक घेतले. त्यांना बालग्रामध्ये आई-वडिलांचे छत्र मिळवून दिले. तिथल्या विशेष कुटुंब पद्धतीत मुले रमली. शिकून मोठी झाली. स्वावलंबीही बनली. तसेच राष्ट्र सेवा दल पुरस्कृत नळदुर्गच्या ‘आपलं घर’नेही भूकंपग्रस्त मुलांना आधार दिला. या सर्व संस्थांसह मदतीसाठी धावलेल्या सर्वांचेच ऋण किल्लारी आणि ५२ भूकंपग्रस्त गावकºयांच्या मनात हृदय करून आहेत.

स्वतंत्र पॅकेजसाठी भूकंपग्रस्तांचे साकडे...भूकंपानंतर ५२ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. घटनेला २५ वर्षे झाली, मात्र अद्याप अनेक समस्या कायम आहेत. या भागाच्या विकासासाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी होत आहे. पुनर्वसित गावांमधील पायाभूत सोयी-सुविधा २५ वर्षांनंतरही तुलनेने सुधारल्या नाहीत़ रस्ते, नाल्या, पथदिवे, घरांची डागडुजी, पाणीपुरवठा योजना अशा प्राथमिक गरजाही पूर्ण करता-करता नाकी नऊ येत आहेत़ शिवाय, पुनर्वसनाच्या वेळी उद्यान, धोबीघाट, दवाखाने, शाळा अशा सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेचाही पूर्णपणे विकास झालेला नाही़ या बाबींची पूर्तता करण्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र पॅकेजची तरतूद करा, या मागणीसाठी भूकंपग्रस्तांची एकजूट झाली आहे.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंप