शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Killari Earthquake : २२ हजार भूकंपग्रस्त नोकरीच्या शोधात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:27 IST

Killari Earthquake : समांतर आरक्षणाचा प्रश्न : २५ वर्षांत २,७७५ तरुणांना नोकऱ्या

हणमंत गायकवाड

लातूर : भूकंपग्रस्त भागातील तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये २ टक्के समांतर आरक्षण लागू केले असले तरी प्रत्यक्षात २५ वर्षांत केवळ २ हजार ७७५ तरुणांनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत. आजही तब्बल २० ते २२ हजार उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात आहेत. ३० सप्टेंबर १९९३च्या पहाटे झालेल्या भूकंपात उस्मानाबाद जिल्ह्यातील २७ आणि लातूर जिल्ह्यातील २५ गावे उद्ध्वस्त झाली. भूकंपग्रस्त म्हणून २६ हजार नागरिकांना प्रमाणपत्र मिळाले. कोल्हापूर, नगर, पुणे जिल्हा परिषदांमध्ये अनेकांना भूकंपग्रस्त प्रमाणपत्रावर शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. पाचशे ते सहाशे तरुण पोलीस झाले आहेत. शंभरावर तलाठी आहेत.

समांतर आरक्षणासाठी स्थापित झालेल्या कृती समितीने २००५ पासून २००९ पर्यंत याप्रश्नी चिकाटीने लढा दिला. तरीही समांतर आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही. १७ नोव्हेंबर १९९४ चा अनुशेष भूकंपग्रस्तांमधून भरावा, अशी मागणी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या मदत व पुनर्वसन खाते लातूरच्या पालकमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा विचार होईल, अशी आशा भूकंपग्रस्तांमधून व्यक्त केली जात आहे.घर खरेदी हस्तांतरणाबाबत पुनवर्सन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. प्रदीप मरवाळे म्हणाले, काही घरांचा अंतर्गत वाद सुरू आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांसोबत बैठक झाली असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. भूकंप झाला त्यादिवशी सकाळी ६ वाजताच शरद पवार किल्लारीत आले. विलासराव देशमुख यांनीही भूकंपग्रस्तांच्या हिताचे निर्णय घेतले. समांतर आरक्षण हा त्यांचाच निर्णय होता.

दुष्काळमुक्त निर्धार कार्यारंभ सोहळाभारतीय जैन संघटनेने लातूर व उस्मानाबाद हे दोन जिल्हे दुष्काळमुक्त करण्यासाठी दत्तक घेतले आहेत़ या दोन्हीही जिल्ह्यांत जलसंधारणाची कामे करून दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार संघटनेने केला आहे़ त्या अनुषंगाने किल्लारी येथे रविवारी दुपारी या कामांचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा़ शरद पवार अध्यक्षस्थानी असतील.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूर