शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात खरीपाचा पेरा केवळ ८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 17:54 IST

पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत़

ठळक मुद्देपावसाची हुलकावणी चाड्यावरच मूठ स्थिरावली

- आशपाक पठाण  

लातूर : पावसाने हुलकावणी दिल्याने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांना ब्रेक दिला आहे़ ४ जुलै पर्यंत जिल्ह्यात केवळ ८ ते १० टक्के खरीपाचा पेरा झाला असून, ९० टक्के शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहेत़ निलंगा, उदगीर व देवणी तालुक्यातील काही भाग वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 94 मिमी पाऊस झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत शेती करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी जून पर्यंत जमीनी पेरणीयोग्य करून ठेवल्या़ लातूर जिल्ह्यात खरीपाचे एकूण ६ लाख हेक्टर्स क्षेत्र आहे़ यात ८० टक्के पेरा हा सोयाबीनचा केला जातो़ गतवर्षी खरीप आणि रबी हंगाम हातचे गेल्याने यावर्षी तरी लवकर पेरण्या होतील, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते़ मात्र जिल्ह्यात निलंगा, अंबुलगा, उदगीर, देवणी परिसरात काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली आहे़ मात्र इतर ठिकाणचे शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ खते, बियाणे खरेदी करून शेतकरी पावसाकडे लक्ष देऊन आहेत़ गेल्या १५ दिवसांपासून एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना आता पेरणीची चिंता लागली आहे़ जुलै उजाडला तरी जिल्ह्यात केवळ ८ ते १० टक्के पेरण्या झाल्या आहेत़ ९० टक्के शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ काही शेतकरी किरकोळ ओल असल्याने पावसाच्या आशेवर पेरण्या करीत आहेत़ मात्र आठ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाचे अजूनही पुनरागमन झाले नसल्याने पेरण्या केलेले शेतकरीही चिंताग्रस्त आहेत़ 

उदगीर, देवणी, निलंग्यात पेरण्यालातूर जिल्ह्यात खरीपाचे ६ लाख हेक्टर क्षेत्र आहे़ अद्यापपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झालेला नाही़ निलंगा तालुक्यातील अंबुलगा व परिसरात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला़ तसेच देवणी व उदगीर तालुक्यातील काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत़ शिवाय, लातूर, औसा, रेणापूर, चाकूर आदी ठिकाणी तुरळक पेरण्या झाल्या आहेत़ ४ जुलैपर्यंत केवळ ८ ते १० टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली़ 

ओल पाहून निर्णय घ्याशेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करण्यापूर्वी जमिनीतील ओल तपासून घ्यावी़ किमान ६ इंच तरी ओलावा आवश्यक आहे़ जिल्ह्यात बहुतांश भागात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये़ काही ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवानुसार पेरण्या केल्या आहेत़ मात्र चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर