जिल्हास्तरीय संस्कृत भाषण स्पर्धेत विद्यालयाची वेणू प्रसाद कुलकर्णी हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याच विद्यालयातील राजकन्या प्रवीण जोशी हिने द्वितीय क्रमांक पटकावला असून मोहिनी गोविंद मुंडे व गायत्री चंद्रकांत जोशी या दोघींनी विभागून तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. उत्तेजनार्थ याच विद्यालयातील ऋचा रेणुकादास जोशी व श्रिया श्यामसुंदर देव या दोघींनी मिळविले आहे. संस्कृत गीत गायन स्पर्धेत श्रीया श्यामसुंदर देव द्वितीय तर चैताली श्रीराम कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्कृत शिक्षक लता कुलकर्णी, जान्हवी देशमुख तसेच संतोष बिडकर, नरेंद्र इरलापल्ले यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अलुरकर, कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह चंद्रकांत मुळे, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष यशवंतराव तावशीकर,कार्यवाह जितेश चापसी, शालेय समितीचे अध्यक्ष आनंदराज देशपांडे,विद्या सभा अध्यक्ष किरण भावठाणकर,मुख्याध्यापक सुनील वसमतकर, उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, संजय कुलकर्णी, दिलीप चव्हाण, संदीप देशमुख, अंजली निर्मळे यांनी कौतुक केले.
जिल्हास्तरीय संस्कृत भाषण स्पर्धेत केशवराज विद्यालय प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST