जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे व पंचायत समितीच्या माजी सभापती अयोध्याताई केंद्रे यांनी केंद्रेवाडी हे गाव दत्तक घेतले आहे. गावच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्यामुळे गाव प्रगतिपथावर आहे. सरपंच ज्योती माधव केंद्रे यांनी उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांची बैठक घेऊन खांब तेथे फोकस योजना राबविली आहे. गावातील प्रत्येक खांबावर पथदिवे बसविण्यात आला आहे. त्यामुळे गाव प्रकाशमय झाले आहे.
गावातील जिल्हा परिषद शाळेसह एकूण ४२ अत्याधुनिक विद्युत दिवे लावण्यात आले आहेत. त्यासाठी अशोक केंद्रे यांनी स्वत: काही आर्थिक मदत केली आहे. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे, माजी सभापती अयोध्याताई केंद्रे, सरपंच ज्योती केंद्रे, माधव केंद्रे, ग्रामसेवक एम.एस. केंद्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य इंद्रायणी केंद्रे, पुष्पा केंद्रे, भानुदास केंद्रे, ज्ञानोबा केंद्रे, तुकाराम केंद्रे यांचे गावकरी कौतुक करीत आहेत.