उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचे २१ हजार, सेवाभाय क्रीडा मंडळ काडगाव, प्रेमनाथ आकनगिरे यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे बक्षीस आष्टी पाटाेदा येथील धसदादा क्रीडा मंडळ, गंगाधर आकनगिरे यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचे १० हजारांचे बक्षीस रेणापूर येथील जय हनुमान क्रीडा संघाला प्रदान करण्यात आले. चौथे बक्षीस भारत इगे यांच्या वतीने ५ हजार रुपयांचे बक्षीस मानवत स्पोर्ट अकॅडमी या संघाला प्रदान करण्यात आले.
यावेळी शंकरराव बुड्डे, शिवाजी कोंडणगिरे, दीपक हिंगणे, लालबा कावळे, लक्ष्मण वेल्लाळे, अनिल मांडवकर, ज्ञानोबा लहाने, प्रदीप मुसांडे, मिलिंद कांबळे, राजाभाऊ राठोड, बाबुराव नलवाड, विनोद लखनगिरे, नागनाथ जांभळे, बालाजी तिरुके, सुधाकर नागमोडे, चंद्रकांत पोटे यांनी पंचाची भूमिका पार पाडली. सूत्रसंचानल सिध्देश्वर मामडगे यांनी केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रेमनाथ आकनगीरे यांच्यासह रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेक अकनगीरे, रविकांत आकनगीरे, गंगाधर आकनगीरे, भारत इगे, अंगद कोतवाड, संजय आकनगीरे, विठ्ठल औसेकर, सुरज आकनगीरे, अंकुश मोटेगावकर, नागेश बस्तापुरे, अजय औसेकर, राहुल आकनगीरे, चेतन मोटेगावकर, गोपाळ इगे, शुभंम दळवी, सुग्रीव टीप्परकर, सतीश उगीले यांनी अधिक परिश्रम घेतले.