५५० रेमडेसिविरचे न्यायिक पद्धतीने वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:20 AM2021-05-09T04:20:23+5:302021-05-09T04:20:23+5:30

लातूर : रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा कायम असून, दररोज ५०० ते ६००च्या दरम्यान इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. दरम्यान, मागणी हजार ...

Judicial distribution of 550 Remadesevir | ५५० रेमडेसिविरचे न्यायिक पद्धतीने वितरण

५५० रेमडेसिविरचे न्यायिक पद्धतीने वितरण

googlenewsNext

लातूर : रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा कायम असून, दररोज ५०० ते ६००च्या दरम्यान इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. दरम्यान, मागणी हजार ते १,२०० इंजेक्शनची असताना पुरवठा ५०० ते ६०० इंजेक्शनचा होत आहे. त्यामुळे रुग्ण, नातेवाईकांना इंजेक्शनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. शनिवारी ५५० इंजेक्शन उपलब्ध झाली. त्यांचे न्यायिक पद्धतीने वितरण उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले. रुग्णालयनिहाय दाखल असलेल्या व्हेंटिलेटरवरील, बायपॅपवरील, आयसीयूमधील रुग्णांची संख्या विचारात घेऊन न्यायिक पद्धतीने या इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील किरकोळ औषध विक्री दुकानामधून हे इंजेक्शन शासनाने निर्धारित केलेल्या किमतीनुसार मिळावे, यासाठी आदेश देण्यात आले आहेत. संबधितांना इंजेक्शनच्या दराबाबत दर्शनी भागात फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न...

ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आणि ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता अशा संकटातून लातूर जिल्हा वाटचाल करत आहे. ऑक्सिजनचाही तुटवडा आहे. रेमेडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा असून, रुग्णसंख्या वाढत असल्याने बेडही मिळत नाही. तरीही स्थानिक प्रशासन यातून मार्ग काढून रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: Judicial distribution of 550 Remadesevir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.