शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्यात झोपलेल्या तरुणाची ठरली अखरेची रात्र, सकाळी आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

By हरी मोकाशे | Updated: December 30, 2023 16:51 IST

धारदार शस्त्राने झोपीतील तरुणावर वार करुन खून, खूनाचे कारण उलगडेना

औसा (जि. लातूर) : तालुक्यातील वडजी येथील एका २५ वर्षीय तरुणावर अज्ञातांनी धारधार शस्त्राने झोपीतच वार करुन खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण अद्यापही उलगडले नाही.

रणजित तानाजी माळी (२५, रा. वडजी, ता. औसा) असे मयत तरुणाचे नाव आहे. वडजी येथील मयत रणजित माळी हा दुधाचा व्यवसाय करीत होता. त्याच्याकडे १० म्हशी असल्याने तो आंदोरा रस्त्यावर असलेल्या शेतातील गोठ्यात रात्री मुक्कामी राहत असे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री शेतात झोपण्यासाठी गेलेला रणजित हा शनिवारी सकाळी दूध घेवून डेअरीला आला नसल्याने आई-वडिलांनी त्याची चौकशी केली.

तेव्हा त्याचे मित्र शेतात गेले असता त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तसेच मृतदेहावर पलंग पडला होता. हे पाहून मित्रांनी त्याच्या आई- वडिलास माहिती दिली. त्यावरुन आई- वडिलांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आल्याने भादा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

याप्रकरणी भादा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले, सपोनि. बाळासाहेब डोंगरे यांनी भेट देऊन पाहणी केली. मयत रणजितच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर