तेरणा नदीवरून तगरखेडा, हालसी, तुगाव, श्रीमाळी, मेहकर, आळवाई पुढे वलांडी, देवणी असा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. सदर रस्त्यावरील औराद येथील तेरणा नदीवर पूल बांधण्याचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे; पण या पुलाचे दाेन काॅलम हे शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात जात आहेत. सदर ठिकाणी जमीन अधिग्रहण करणे आवश्यक आहे. सदर अधिग्रहणाचा प्रस्ताव वर्षभरापासून रखडला आहे. या प्रस्तावास मान्यता द्यावी, अशी मागणी शनिवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नदीकाठची गावे व बंधाऱ्यांची पाहणी केली. यावेळी औराद, तगरखेडा रस्त्यावरील पुलाची पाहणी करून सदरील भूसंपादनाच्या प्रस्तावावर निर्णय घेऊन काम करू, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी सरपंच केवळाबाई सूर्यवंशी, उपसरपंच मदन बिरादार, माजी सरपंच वैजनाथ वलांडे, चेअरमन रमेश राघाे, मधुकर बिरादार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित हाेते.
तेरणावरील पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST