उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती सरस्वती पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा होते. यावेळी बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त नानासाहेब कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष बुकशेठवार आदी उपस्थित होते.
यावेळी सभापती शहा यांनी बाजार समितीच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असून त्यात सामाजिक दायित्व म्हणून पशु चिकित्सा शिबीर घेण्यात येते. यावेळी उपसभापती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मांजरा साखर कारखान्याचे संचालक शंकरराव बोलंगे, धनराज दाताळ, रावसाहेब पाटील, माजी सरपंच राजेसाहेब पाटील, सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव जटाळ, विलास साखर कारखान्याचे संचालक दगडु पडिले, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बिदादा, गोविंद नरहरे, आडे, हर्षवर्धन सवई, प्रभारी सचिव सतीश भोसले, सहाय्यक सचिव शिंदे उपस्थित होते.
या शिबिरात उदगीरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. के.एस. चौधरी, डॉ. आनंद मोहन, डॉ. स्नेहल रामटेके यांच्यासह त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले.