शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या वीज अटकाव यंत्रणेमुळे दहा वर्षांत ७९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 06:00 IST

जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किमान २० ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारणे गरजेचे आहे.

लातूर : जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किमान २० ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारणे गरजेचे आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत केवळ ४ ठिकाणी हे मनोरे उभारण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत वीज पडून ७९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शासनदप्तरी आहे.जिल्ह्यातील बुधोडा, खरोसा (ता. औसा), हेर (ता. उदगीर) आणि वडवळ नागनाथ (ता. चाकूर) या परिसरात गेल्या दहा वर्षांत वीज अटकाव मनोरे उभारण्यात आले आहेत. शासनाकडून पावसाळ्याच्या दिवसात आणि अवेळी पडणाºया पावसात वीज पडून पशुधनांसह मानवी जीवितहानी होते. ती रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची मदत घेऊन वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. २००९ मध्ये प्रथम दोन मनोरे उभारण्यात आले. त्यामध्ये वडवळ नागनाथ आणि बुधोडा येथील मनोºयांचा समावेश आहे, त्यानंतर २०१० मध्ये हेर आणि खरोसा येथील उंच भागावर मनोरे उभारण्यात आले. या अटकाव यंत्रणेची देखभाल संबंधित तहसील कार्यालयाकडे आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक तालुक्यांत दोन मनोरे उभारण्याची गरज आहे. मात्र २०१० नंतर नव्याने एकही मनोरा उभारण्यात आला नाही. २०१५ या वर्षात झालेल्या गारपिटीमुळे १६ जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. २००८ ते २०१८ या कालावधीतील २०१५ मध्ये सर्वाधिक जीवितहानी झाल्याचे प्रशासनाने सांगितले.वारसांना आर्थिक मदतपावसाळ्याच्या दिवसात अथवा अवकाळी पावसात वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना २०१५ पर्यंत दीड लाख रुपयांची मदत दिली जात होती. त्यानंतर या मदतीमध्ये २०१५ नंतर अडीच लाखांची वाढ करण्यात आली आहे. २०१५ नंतरच्या मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत करण्यात आली आहे. २००८ ते २०१४ या कालावधीत ५३ जणांच्या कुटुंबियांना दीड लाख रुपयांप्रमाणे करण्यात आली. तर २०१५ ते २०१८ या कालावधीत २६ जणांच्या कुटुंबियांना १ कोटी ४ लाखांची मदत करण्यात आली.