शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी पकडली दारू; सहा जणांवर गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: June 12, 2023 23:48 IST

अवैध दारु विक्रीने अख्खे गाव झाले त्रस्त, भादा गावातील नागरिकांसह पोलिसांनी तेथे धाडी टाकल्या असून, पाेलिसांनी दारुचा साठा जप्त केला आहे.

औसा (जि. लातूर) : तालुक्यातील वडजी येथे अवैध देशी, विदेशीसह गावठी दारूची विक्री वाढली होती. त्यामुळे गावात तंट्यांचे प्रमाण वाढले असून, सोमवारी त्रस्त झालेल्या गावकऱ्यांच्या मदतीने भादा पोलिसांनी वेगवेगळ्या तीन ठिकाणी अचानक धाडी टाकल्या. यावेळी देशी-विदेशी दारुचा साठा जप्त केला आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात सहा जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. 

पाेलिसांनी सांगितले, भादा पोलिस ठाण्याच्या हद्दीत औसा तालुक्यातील वडजी येथे माेठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारुची बिनदिक्कत विक्री हाेत असून, यामुळे त्रस्त झालेल्या महिलांसह नागरिकांनी भादा पाेलिस ठाण्यात एकत्र येत पोलिसांना निवेदन दिले. गावात सुरु असलेली दारु बंद करुन, गावात दारूबंदी करण्याची मागणी केली आहे. वडजी येथे शिवाजी मुळे, प्रकाश साठे, चतुर्भुज माळी हे अवैधरित्या दारूविक्री करीत होते. भादा गावातील नागरिकांसह पोलिसांनी तेथे धाडी टाकल्या असून, पाेलिसांनी दारुचा साठा जप्त केला आहे. याबाबत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पाेलिस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी दिली. 

या कारवाईसाठी पाेलिस, गावकऱ्यांनी घेतला पुढाकार...वडजी गावात हाेणाऱ्या दारुचा बंदाेबस्त करण्यासाठी, दारु विक्रेत्यांवर धाडी टाकण्यासाठी त्रस्त झालेले नागरिक, महिला आणि भादा ठाण्याच्या पाेलिसांनी पुढाकार घेत ही कारवाई केली. यावेळी सरपंच महादेव गुरुशेट्टे, ग्रामपंचायत सदस्या दैवशाला माळी, गोविंद कोळी, तंटामुक्ती अध्यक्ष रामप्रसाद दत्त, सचिन घुले, लखन माळी, धीरज मुळे, सायना माळी, जयश्री माळी, मैना चव्हाण, रुक्मिण कदम, पंकज माळी, अंगद माळी, निवास मुळे, नारायण नकाते यांच्या बिट अंमलदार डोलारे हे उपस्थित हाेते.