शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी शेतकरी संघटनेचा लातुरात मोर्चा

By संदीप शिंदे | Updated: December 26, 2022 16:42 IST

उसाला पहिली उचल ३ हजार रुपये प्रतिटन एकरकमी देण्याची मागणी

लातूर : जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक असून, खरिपात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अंतिम पैसेवारीही ४६ पैसे आली असून, विमा कंपनी संरक्षित रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने अनेक शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्यापोटी हेक्टरी ५४ हजार रुपयांची संरक्षित रक्कम द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

गळीत हंगाम २०२२-२ साठी उसाला पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये एकरकमी देण्यात यावी,सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करण्यात यावेत,२०२२ मधील अतिवृष्टीचे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावे, सोयाबीनला ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर शासनामार्फत शेतकऱ्याच्या उसातील साखर उतारा तपासण्यासाठी यंत्रणा उभारावी, साखर आयुक्तांच्या आदेशानुसार साखर कारखान्यांच्या वजनकाटा तपासणी समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात विधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार जाधव,धर्मराज पाटील, माणिक गायकवाड,उषाताई झिंगे,महारुद्र चौंडे,व्यंकट मुळके,काकासाहेब जाधव,बालाजी शिंदे,बबन चव्हाण, प्रकाश रोडगे,रामभाऊ नलावडे,दत्तू टिपे,अशोक दहीफळे, गोविंद बस्तापुरे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी जाहीर करा...नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या असून,तिसरी यादी तात्काळ जाहीर करून लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान तातडीने वर्ग करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

 

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी