शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीत औसा तालुका आघाडीवर

By हरी मोकाशे | Updated: April 8, 2024 18:02 IST

जिल्हा परिषद : मार्चअखेरपर्यंत ९३.१० टक्के कर वसुली

लातूर : गावच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असला तरी काही आवश्यक मूलभूत सोयी- सुविधांसाठी घरपट्टी, पाणीपट्टी कर वसुली महत्त्वाची ठरते. त्यामुळे ग्रामपंचायतींचे कर वसुलीवर विशेष लक्ष असते. जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या मिशन स्वाभिमान मोहिमेमुळे मार्चअखेरीस एकूण ५८ कोटी २४ लाख ९४ हजारांची कर वसुली झाली आहे. ती ९३.१० टक्के आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक गावच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येतो. त्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळते. मात्र, काही नियम, अटी आणि तांत्रिक बाबींमुळे गावातील सर्व भागांचा अपेक्षित विकास साधणे कठीण होते. परिणामी, गावातील नागरिकांत नाराजी निर्माण होण्यास सुरुवात होते. काही वेळेस वादही उद्भवण्याची भीती असते. अशावेळी घरपट्टी, पाणीपट्टी कर वसुली अत्यंत उपयुक्त ठरते. त्यातून गावकऱ्यांच्या मागणीनुसार सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

५८ कोटी २४ लाख ९४ हजारांची वसुली...जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टी व घरपट्टीपोटी ६२ कोटी ५६ लाख २४ हजार रुपयांचा कर भरणा होणे अपेक्षित होते. मार्चअखेरपर्यंत पाणीपट्टीपोटी ३५ कोटी ७० लाख तर घरपट्टीपोटी २२ कोटी ५४ लाख ९४ हजारांचा कर वसुली झाली आहे. एकूण ५८ कोटी २४ लाख ९४ हजारांची कर वसुली झाली आहे.

औसा तालुक्यात ११ कोटींची वसुली...तालुका - कर वसुलीअहमदपूर - ७ कोटी ३३ लाखऔसा - ११ कोटी ५ लाखचाकूर - ४ कोटी ७४ लाखदेवणी - २ कोटी ५० लाखजळकोट - १ कोटी ८३ लाखलातूर - ८ कोटी ९८ लाखनिलंगा - ९ कोटी ९२ लाखरेणापूर - ३ कोटी ७४ लाखशिरुर अनं. - १ कोटी ९० लाखउदगीर - ६ कोटी २१ लाखएकूण - ५८ कोटी २४ लाख

महिनाभरात ९ कोटींचा कर भरणा...फेब्रुवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात ४८ कोटी ९० लाख १३ हजार रुपयांची कर वसुली झाली होती. आणखीन १३ कोटी ६६ लाख ११ हजारांची वसुली थकित राहिली होती. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी मार्चमध्ये कर वसुली पंधरवडा राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्या नियोजनाखाली गावोगावी पथके नियुक्ती करण्यात आले होते. त्यामुळे १५ दिवसांत जवळपास ९ कोटींची कर वसुली झाली आहे.

टॅग्स :laturलातूरTaxकर