शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कॉपी करणाऱ्या तिघांवर कारवाई, मोबाईल आढळल्याने दोन शिक्षकांना नोटीसा

By संदीप शिंदे | Updated: March 6, 2023 18:37 IST

लातूरमध्ये कॉपी करणाऱ्या तिघांवर कारवाई करण्यात आली असून मोबाईल आढळल्याने दोन शिक्षकांना नोटीस देण्यात आली आहे. 

लातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्यापरीक्षा सुरु असून, सोमवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. दरम्यान, देवणी तालुक्यातील वलांडी येथील व्यकंटेश विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर कॉपी करणाऱ्या तिघांना पकडण्यात आले. याप्रकरणी त्यांच्यावर रेस्टीकेटची कारवाई करण्यात आली. तर देवणी येथे परीक्षा केंद्रावर दोन शिक्षकांकडे मोबाईल आढळल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १४९ केंद्रावर दहावीची परीक्षा सुरु असून, परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून भरारी पथकांची नियुक्त करण्यात आली आहे.

सोमवारी इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी देवणी येथील योगेश्वरी विद्यालयातील केंद्रावर भेट दिली असता तेथील दोन शिक्षकांकडे मोबाईल आढळून आला. याप्रकरणी त्या शिक्षकांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाने यांनी देवणी तालुक्यातील वलांडी येथील व्यंकटेश विद्यालयाच्या केंद्रावर अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांना दोन मुली व एक मुलगा कॉपी करत असताना आढळून आला. त्यांनी तातडीने तीन विद्यार्थ्यांवर रेस्टीकेटची कारवाई केली.

भरारी पथकांच्या अचानक भेटी...सोमवारी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. त्यामुळे दक्षता समितीच्या निर्देशानुसार २९ भरारी पथकांनी विविध केंद्रांना अचानक भेटी दिल्या. तर शिक्षणाधिकाऱ्यांनी देवणी तालुक्यात कारवाई केली. दरम्यान, उर्वरित परीक्षाही कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी परीक्षांवर भरारी पथकांची करडी नजर राहणार असल्याचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, वंदना फुटाणे यांनी सांगितले.

 

टॅग्स :laturलातूरexamपरीक्षाssc examदहावी