देवणी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मे महिन्यात मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्यावतीने बुधवारी निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी राज्य सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला.
राज्य सरकारतर्फे रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी सन २०१९-२० व २०२०-२१मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना अद्यापही कार्यारंभ आदेश आणि अनुदान देण्यात आलेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या घरकुलाला तत्काळ मंजुरी देण्यात यावी, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर रिपाइंचे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे, तालुकाध्यक्ष विलास वाघमारे, युवा तालुकाध्यक्ष गणेश कांबळे, लक्ष्मण कांबळे, धनराज गायकवाड, रोहित डोंगरे, विक्रम गायकवाड, गोविंद हणमंते, राजकुमार कांबळे, पप्पू बनसोडे, गुणवंत कांबळे, विठ्ठल गायकवाड, मधुकर कांबळे, संदीप कांबळे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.