शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

नियमांकडे दुर्लक्ष; १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, दोघांचे कायमस्वरूपी रद्द

By हरी मोकाशे | Updated: June 21, 2023 19:32 IST

कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषी निरीक्षकांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली.

लातूर : खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे व खते पुरवठ्यासाठी कृषी विभागाने केलेल्या सूचनांचे पालन न केल्याप्रकरणी जिल्ह्यातील १६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात १४ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून दोन कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषी निरीक्षकांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान कृषी सेवा केंद्रात विक्री परवाना दर्शनी भागात न लावणे, साठा व भाव फलक सहज दिसेल अशा ठिकाणी नसणे, साठा नोंदवही अद्ययावत न ठेवणे, बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा न घेणे, विक्री बिलात बियाण्यांचा संपूर्ण तपशील न लिहिणे, दुकानात वजन काटा न ठेवणे, विहित मुदतीत परवान्याचे नूतनीकरण करून न घेणे, लिंकिंग करणे आदी त्रुटी आढळून आल्या.

हे प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्ह्यातील १० बियाणे विक्री केंद्र आणि चार खत विक्री केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच, एका बियाणे विक्री केंद्राचा आणि एका खत विक्री केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

औसा तालुक्यातील ५, लातूर- ३, अहमदपूर- ४, चाकूर- २, रेणापूर- १ आणि निलंगा तालुक्यातील १ अशा एकूण १६ कृषि निविष्ठा विक्री केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची नियमित तपासणी केली जात असून पेरणीच्या तोंडावर तपासणीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान, अनियमितता आढळून आल्यास विक्री केंद्राचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात येत आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

पावसापूर्वी खते खरेदी कराखरीप हंगामाच्या कालावधीत दुकानात होणारी गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लागणारी खते पाऊस होण्यापूर्वी खरेदी करावीत. त्यामुळे ऐनवेळी शेतकऱ्यांची धावपळ होणार नाही, असे आवाहनही प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी केले आहे.

त्रुटी आढळल्यास कठोर कारवाईसाठा फलक, भावफलक न लावणे, साठा नोंदवहीतील साठा व प्रत्यक्षात साठ्यात तफावत आढळणे, तसेच बियाणे व खताचा भावफलक, साठा नोंदवही अद्ययावत नसणे, बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा न घेणे, विक्री बिलात बियाण्यांचा संपूर्ण तपशील न लिहिणे, खत अथवा बियाण्यांची लिंकिंग केल्यास विक्री केंद्राविरुद्ध कडक कारवाई करण्यात आहे.- रक्षा शिंदे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर