शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

HSC Result: विभागीय मंडळात लातूर जिल्हा अव्वल; विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 18:28 IST

विज्ञान ९८.५४, कला ९३.४१ तर वाणिज्य ९६.५ टक्के निकाल

लातूर : बारावीच्या परीक्षेत लातूर विभागीय मंडळातून लातूर जिल्ह्याच्या विज्ञान शाखेचा निकाल ९८.५४, कला ९३.४१, वाणिज्य ९६.५ तर एचएससी व्होकेशनल ९३.३ टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत लातूर जिल्हा विभागात अव्वल क्रमांकावर राहिला आहे.

लातूर जिल्ह्यातून विज्ञान शाखेला १६ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १६ हजार ७५० प्रविष्ट झाले. त्यात १६ हजार ५०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९८.५४ टक्के एवढा आहे. कला शाखेसाठी ११ हजार ३५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ११ हजार ४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यात १० हजार ३२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या शाखेचा निकाल ९३.४१ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेसाठी ४ हजार ९८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ४९४५ प्रविष्ट झाले. त्यात ४७५० उत्तीर्ण झाले असून, या शाखेच्या निकालाची टक्केवारी ९६.५ अशी आहे. एचएससी व्होकेशनल विभागासाठी २३४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी २२२४ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यात २०६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एचएससी व्होकेशनल विभागाच्या निकालाची टक्केवारी ९३.३ अशी आहे.                .

विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी...लातूर विभागीय मंडळाअंतर्गत बारावीच्या परीक्षेस बसलेल्या ८८ हजार ८३० विद्यार्थ्यांपैकी १८ हजार १७२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, प्रथम श्रेणीत ४१ हजार ५१०, द्वितीय श्रेणीत २३ हजार २२२ तर १७११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

३८ विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द...लातूर विभागीय मंडळाअंतर्गत २१२ मूळ केंद्र व ५५३ उपकेंद्र असे एकूण ७६५ केंद्र मुक्रर करण्यात आले होते. या परीक्षेत केंद्रावर २५ तर उत्तरपत्रिकेत खाडाखोड करणे १३ असे एकूण ३८ गैरप्रकार आढळून आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची त्या-त्या विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली असल्याचे विभागीय सचिव सुधाकर तेलंग म्हणाले.

टॅग्स :laturलातूरHSC Exam Resultबारावी निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्र