शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता वाढणार तरी कशी? ‘झेडपी’ शाळांना गुरुजींच्या रिक्त जागांचे ग्रहण !

By संदीप शिंदे | Updated: September 26, 2022 19:19 IST

लातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत ८९१ जागा आहेत.

लातूर : आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू असून, शिक्षक भरतीअभावी रिक्त जागांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. लातूर तालुक्यात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर, सहशिक्षकांच्या ८४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे सेवेतील शिक्षकांवर ताण वाढत असून, विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे.

लातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत ८९१ जागा आहेत. त्यापैकी ८०७ जागा भरलेल्या असून, ८४ जागा रिक्त आहेत. यामध्ये विस्तार अधिकारी १, केंद्रप्रमुख ९, मुख्याध्यापक १६, प्राथमिक पदवीधर शिक्षक १७, सहशिक्षक ३५, माध्यमिक शिक्षक २, कनिष्ठ सहायक १ आणि परिचर यांच्या ३ जागा रिक्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून रिक्त पदे शासनाकडून भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आहे त्या शिक्षकांवरच इतर विषय शिकविण्याची जबाबदारी आली आहे. विशेष म्हणजे जागा रिक्त असतानाही जि. प. शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीसाठी रिक्त पदांचा अहवाल शून्य कळविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी जि. प.ची दारे बंद झाली आहेत. त्यामुळे आता पदोन्नती करूनच रिक्त पदांचा अहवाल कळविला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

सहशिक्षकांची ३५ पदांना मुहूर्त मिळेना...दगडवाडी, कानडी बोरगाव, चिंचोली ब., गोंदेगाव, पाखरसांगवी, जेवळी, दिंडेगाव, गांजूर, वांजरखेडा, साखरा, भोसा, तांदुळवाडी, बोरी, ढोकीह, कव्हा, सामनगाव, चव्हाणवाडी, भोयरा, भातखेडा, खंडापूर, गंगापूर, भातांगळी, चिकलठाणा, गुंफावाडी, कोळपा, बोरवटी चाटा आदी गावातील जि.प. शाळेत ३५ सहशिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पदांच्या भरतीसाठी मुहूर्त मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

१६ शाळांवर मुख्याध्यापकच नाही...

लातूर तालुक्यामध्ये १६५ जि.प.शाळा असून, यामध्ये १५९ प्राथमिक तर ६ माध्यमिक शाळांचा समावेश आहे. जवळपास १६ शाळांवर मुख्याध्यापकांच्या जागा रिक्त आहे. तर चिंचोली ब. येथे विस्तार अधिकारी, बाभळगाव, महमदापुर, गातेगाव, हरंगुळ बु., वासनगाव, कासारखेडा, शिराळा आदी ठिकाणी केंद्रप्रमुखांची ९ पदे तर इतर १६ शाळांमध्ये १७ प्राथमिक पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

वरीष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु...लातूर तालुक्यामध्ये १६५ जि.प. शाळा असून, यामध्ये माध्यमिकच्या ६ शाळांचा समावेश आहेत. विविध संवर्गातील ८४ पदे रिक्त असून, या जागेवर नेमणुका देण्यासाठी वरीष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यानुसार लवकरच अंमलबजावणी होईल. रिक्त पदांचा अहवालही वरीष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले यांनी सांगितले.

 

टॅग्स :laturलातूरTeacherशिक्षक