अजनसोंडा (बु.) येथील नारायण माने यांच्या घराला शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. त्यात संपूर्ण घर जळाले. आगीत संसारोपयोगी भांडी, वस्तू, दागिने, रोकड, तुषार सिंचनचे पाईप सेट, पत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू असे एकूण ३ लाख ५० हजाराचे नुकसान झाले. आग लागल्याचे समजताच तुळशीदास माने, किरण गायकवाड, महेश कांबळे, गगन भालेराव, भुरकापल्ले, विकास जोशी, धर्मपाल भालेराव, महेश झोले यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दुपारी ५ वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यास त्यांना यश आले. ही आग कशामुळे लागली, हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच तलाठी बालाजी हाक्के यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला.
अजनसोंड्यात घरास आग, साडेतीन लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:19 IST