शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत यजमान नांदेड विद्यापीठाची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 12:19 IST

बुधवारपासून सुरू झालेल्या मुलांच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत यजमान नांदेड विद्यापीठाने विजयी सलामी दिली. 

ठळक मुद्देअखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत ५५ विद्यापीठांच्या संघाची हजेरी देशभरातील ५५ विद्यापीठांतील ८०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.

लातूर : नांदेडचे स्वारातीम विद्यापीठ व लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारपासून सुरू झालेल्या मुलांच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत यजमान नांदेड विद्यापीठाने विजयी सलामी दिली. 

या स्पर्धेत देशभरातील ५५ विद्यापीठांतील ८०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेचे उद्घाटन महापौर सुरेश पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनपाचे स्थायी समितीचे सभापती अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, राष्ट्रीय क्रीडा शास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप देशमुख, संस्था सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, उपाध्यक्ष डॉ.पी. आर. देशमुख, गोपाळ शिंदे, प्रशांत जगताप, सिंकूकुमार सिंह, बी.ए. मैंदर्गे, अजय दुडिले, बालाजी होळके यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी केले. या स्पर्धा संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलसह नवोदय विद्यालय व ज्ञानेश्वर नगर अशा तीन मैदानांवर होत आहेत. यशस्वितेसाठी प्रा.डॉ. अनिरुद्ध बिराजदार, मुजिब हसन, साजिद पठाण, सुरेश देशमुख, आनंद भोसले आदी परिश्रम घेत आहेत. 

दोन्ही लढती एकतर्फी जिंकल्या यजमान नांदेड विद्यापीठाने पहिल्या फेरीत गोंडवना विद्यापीठ गडचिरोलीचा १० रनांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यातही भोपाळ विद्यापीठाला १० रनांनी लोळविले. दुसऱ्या सामन्यात नागपूर विद्यापीठाने जिंद विद्यापीठाचा ७ रनांनी पराभव केला. अमरावती विद्यापीठाने कोटा विद्यापीठाचा १२-१ ने पराभव केला. रायपूर विद्यापीठाने भोपाळ विद्यापीठाचा एकतर्फी पराभव केला. अजमेर विद्यापीठाने पाटण विद्यापीठाचा ११-५ ने एकतर्फी पराभव केला. दुपारच्या सत्रात कोल्हापूरने मेंगलोरचा, औरंगाबादच्या बामु विद्यापीठाने अनंतपुरम विद्यापीठाचा तर जम्मू विद्यापीठाने बिलासपूर विद्यापीठाचा एकतर्फी पराभव केला. या स्पर्धा साखळी पद्धतीत चार गटांत होत असून, यातून विजेता ठरेल.

उत्कृष्ट खेळाडू मिळतील...अध्यक्षीय भाषणात माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील म्हणाले, शाहू महाविद्यालयाने यापूर्वी अनेक राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या आहेत. अशा स्पर्धेच्या माध्यमातूनच देशाला उत्कृष्ट खेळाडू मिळतील. यावेळी महापौर सुरेश पवार यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले.

टॅग्स :laturलातूरNandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड