कासार बालकुंदा : निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड व मदनसुरी येथे कोरोना योध्द्यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला. तसेच १६० जणांना लसीकरण करण्यात आले.
कोरोनाच्या संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, आरोग्य सेवा दिल्याबद्दल मदनसुरी येथील डॉक्टर, परिचारिका, आशा स्वयंसेविकांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला. कोविड लसीकरणासाठी ग्रामस्थांना अन्य ठिकाणी जावे लागत असल्याने होणारा त्रास पाहून जिल्हा परिषद सदस्य अरुणा बरमदे यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचे नियोजन केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुणा ज्ञानेश्वर बरमदे, सरपंच अनिता सतीश मोहिते, उपसरपंच आशा दयानंद मुळे, ज्ञानेश्वर बरमदे, डॉ. प्रताप मुंडे, उद्धव मोहिते, राम घोटाळे, माधव रणखांब, संदीप मुळे, दयानंद जाधव, गुलाब धानोरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.