आमच्या पाेटा-पाण्याचे काय...
राज्य शासनाच्या वतीने कामगारांसाठी दीड हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, हा लाभ आम्हाला मिळणार नाही. आम्ही ग्रामीण भागात मजुरीचे काम करताे. आमची नाेंद नाही. काेराेनाच्या काळात आम्हालाही आर्थिक मदतीची गरज आहे. सध्याला बांधकाम क्षेत्रातील काम ठप्प आहे.
- वामन जाधव, कामगार
काेराेनाच्या संकटाने ग्रामीण भागातील कामगारावर संकट आले आहे. या संकटकाळात शासनाच्या मदतीची गरज आहे. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांश कामगारांची शासनदप्तरी नाेंदच नाही. परिणामी, शासनाने जाहीर केलेल्या मदतीपासून हे कामगार वंचित राहणार आहेत. त्यांच्यासाठी शासनाने तातडीने उपाययाेजना करण्याची गरज आहे.
- अमृत गायकवाड, कामगार
मी लागेल ते माेलमजुरी करुन प्रपंच चालविताे. घरात खाणाऱ्यांची ताेंडे अधिक आहेत. परिणामी, सध्याला ग्रामीण भागात राेजगार उपलब्ध नाही. शेतीतील राेजगारही संपुष्टात आला आहे. यातून जगण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. नाेंदणी केलेल्या कामगारांबराेबर नाेंदणी नसलेल्या कामगारांनाही शासनाने मदत देण्याची गरज आहे.
- गाेविंद कांबळे, कामगार