लातूर : निलंगा तालुक्यातील सावरी येथील महात्मा गांधी ग्रामविकास सेवा केंद्र या संस्थेतून शिक्षक म्हणून यू़ डी. गायकवाड हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा ‘उजेडाचा वारस’ हा गाैरवग्रंथ आदर्श, प्रेरणादायी शिक्षकाचा जीवनप्रवास आहे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी येथे केले.
‘उजेडाचा वारस’ या गाैरवग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन, लातूर आणि संयोजन समितीच्यावतीने आयाेजित कार्यक्रमात लातूर येथे झाले. यावेळी आमदार विक्रम काळे बाेलत हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून विचारवंत व प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, के. एस. अतकरे, जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई हालसे, रत्नराज जवळगेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, महात्मा गांधी ग्राम विकास सेवा केंद्राचे कार्याध्यक्ष संजय सावरीकर, संचालक एस. व्ही. जाधव, बी. आर. काळे, अभय साळुंखे, प्रा. सुधीर अनवले, डी. एस. नरसिंगे, कालिदास माने, बसवंतप्पा उबाळे, प्रा. बापू गायकवाड, माणिकराव वाघमारे, बालाजी कांबळे, बापूसाहेब गायकवाड, जी. टी. होसूरकर उपस्थित हाेते. आमदार विक्रम काळे म्हणाले, यू़ डी. गायकवाड हे तळमळीचे, आदर्श हाडाचे शिक्षक आहेत. फुले, शाहू, आंबेडकरी विचार आत्मसात करून त्यांनी ताे विचार जनमानसात पेरत पेरतच स्वतः उजेडाचा वारस झाले आहेत. तर ऋषिकेश कांबळे म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार यू. डी. गायकवाड यांच्या कर्तृत्वाच्या मुळाशी आहे. या महापुरुषांच्या विचारांमुळेच समाजाचे अस्तित्व अभेद्य राहणार आहे. यावर यू. डी. गायकवाड यांची श्रद्धा आहे. ज्यांचा ध्येयासक्तीचा पाया मजबूत असतो त्यांची वाटचाल कधीही डगमगत नाहीत. प्रारंभी प्रतिज्ञा गायकवाड, सुनीता गायकवाड यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाला दिलीप जाधव, नागसेन कांबळे, विभागीय अध्यक्ष होसुरकर, किशोर गायकवाड, बाबुराव बनसोडे, रमेश मांदळे, फुलचंद मांदळे, शरद हणमंते, अशोक देडे, शेषेराव वाघमारे, गोविंद कुंभार, गुरुनाथ सूर्यवंशी, सुरेश सोनकांबळे, उत्तम कांबळे, पंडित कांबळे, नांदेड येथील जिल्हाध्यक्ष वने यांची उपस्थिती हाेती. सूत्रसंचालन प्रा. सतीश हानेगावे यांनी केले.