३८२ रुग्णांची कोरोनावर मात
गुरुवारी एकूण ३८२ रुग्णांना प्रकृती ठणठणीत झाल्याने सुटी देण्यत आली. त्यात गृह विलगीकरणातील ३२४ जणांचा समावेश आहे. एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील २५, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १, समाजकल्याण हॉस्टेल येथील २३ व खाजगी हॉस्पिटलमधील ५ अशा एकूण ३८२ जणांनी कोरोनावर मात केली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९० टक्क्यांवर
३९ हजार १९४ पैकी आतापर्यंत ३० हजार ८८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३०.८० टक्के असून, रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधीत ४२ दिवसांवर आला आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात चिंताजनक वातावरण आहे. मृत्यूचे प्रमाण २.० टक्के असून, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.