शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

Latur Rain: औराद परिसराला मुसळधार पावसाने झोडपले; पाऊण तासात ५५ मि.मी., शेतशिवार पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 17:54 IST

Heavy Rain in Latur: तेरणा नदीवरील बॅरेजेस भरले असून, औराद, तगरखेडा येथील बॅरेजेसचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

औराद शहाजानी (जि. लातूर) : औराद शहाजानी व परिसरात रविवारी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला असून, अवघ्या पाऊनतासात ५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परिसरातील अनेक गावांचा शिवार पाण्याखाली आला आहे. परिसरातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. औराद शहाजानी तसेच कासार बालकुंदा, तगरखेडा, सावरी, बोरसुरी, शेळगी, मानेजवळगा, तांबाळा आदी गावांना पावसाने झोडपले असून, या गावांचा शिवार पाण्याखाली आहे. या गावांना जोडणारे अंतर्गत रस्त्यांवरही पाणी वाहत आहे. या गावांच्या शिवाराला नदीचे स्वरूप आले असून, परिसरात तेरणा नदी दुथडीभरून वाहत आहे.

तेरणा नदीवरील बॅरेजेसचे दरवाजे उघडले...तेरणा नदीवरील बॅरेजेस भरले असून, औराद, तगरखेडा येथील बॅरेजेसचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तब्बल पाऊनतास झालेल्या या पावसात जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक अंतर्गत रस्ते बंद झाले आहेत. दरम्यान, शेतशिवारांमध्ये कंबरेच्यावर पाणी आल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या पाऊन तासामध्ये ५५ मि.मी. पाऊस झाल्याने शेतशिवारांमध्ये ठेवलेले शेतीचे साहित्य वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मेघगर्जनेसह झालेल्या या पावसामुळे तेरणाकाठच्या गावांना मोठा फटका बसला आहे. औराद येथून जाणा-या ७५२ राष्ट्रीय महामार्गावरून पाणी वाहत आहे.

औराद, तगरखेडा, शेळगी, सावरी, तांबाळा, तांबाळावाडी, बोरसुरी आदी गावात अनेक घरांनी पाणी घुसले असून, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसlaturलातूर