शहर महापालिकेत अभिवादन कार्यक्रम
लातूर : शहर महापालिकेत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपायुक्त शशीमोहन नंदा यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त मयुरी शिंदेकर, सहायक आयुक्त सुंदर बोंदर, पिडगे, शिक्षणाधिकारी जाधव आदींसह मनपाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
ऋचा फाऊंडेशनच्या वतीने जनजागृती मोहीम
लातूर : रेणापूर तालुक्यातील ऋचा फाऊंडेशनच्या वतीने लोककला व पथनाट्याद्वारे योजनांची व कोरोनाची जनजागृती मोहीम राबविली जात आहे. यामध्ये मीना वंजळे, कृष्णा जोगदंड, अमित जोगदंड, अविनाश चव्हाण, विष्णू पोतले, रविराज सूर्यवंशी, अशोक चव्हाण यांचा सहभाग आहे. खरोळा, तळणी, कारेपूर, कोष्टगाव, भंडारवाडी, पानगाव, कुंभारी, पोहरेगाव, पळशी आदी गावांत जनजागृती राबविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
जेवळी रस्त्याची दुरवस्था; नागरिकांची गैरसोय
लातूर : तालुक्यातील जेवळीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
चनबस स्वामी यांचा लातुरात सत्कार
लातूर : येथील स्वस्त धान्य दुकानदार चनबस स्वामी यांचा लातूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार कुलदीप देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोना काळात चनबस स्वामी यांनी योग्य खबरदारी घेत धान्याचे वाटप केले. यावेळी हंसराज जाधव, बालाजी तोडकरी, मानकोसकर, माने, किल्लारीकर, सादिक शेख, मुगावे आदींची उपस्थिती होती. या कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र
लातूर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, विशाल जाधव, मंगेश बिराजदार, संतोष पांचाळ, निखिल गायकवाड, शंभुराजे पवार, वैभव डोंगरे, निरज गोजमगुंडे, ॲड. हरिकेश पांचाळ, गणेश गवळी, रविशंकर लवटे, राजेश पवार, ॲड. किशोर शिंदे, दुर्गेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.