येथील कोविड सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची पाहणी करून वैद्यकीय आढावा घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, जि.प.चे समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, सिद्धेश्वर पवार, नितीन रेड्डी, हर्षवर्धन कसबे, अनिल चव्हाण, संग्राम वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी खा. शृंगारे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांना डॉक्टर, परिचारिका व आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी अत्यंत चांगली सेवा दिली आहे. अशाच पद्धतीने तिस-या लाटेशी सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे. पावसाळा तोंडावर येत आहे. कोविड सेंटरमध्ये वीजपुरवठा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी प्रशासनाने मागणी करावी, असेही ते म्हणाले.