पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी संजय गाेविंद गाेटमवाड (४५ रा. व्यंकटेशनगर, अहमदपूर) हे आपल्या राहत्या घराला कुलूप लावून १७ ते १९ जून या कालावधीत बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, बंद असलेल्या घराचा कडी-काेयंडा ताेडून अज्ञात चाेरट्यांनी आत प्रवेश केला. घरात कपाटाच्या दाराशेजारी ठेवलेल्या चावीच्या साहाय्याने कपाट उघडले. कपाटात ठेवण्यात आलेले जवळपास ४५ ताेळे साेन्याचे दागिने आणि पिस्टल असा एकूण २१ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. ते गावावरून परत आल्यानंतर त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-काेयंडा ताेडून घर फाेडल्याचे आढळून आले. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चाेरट्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाेन पथकांची नियुक्ती...
घटनास्थळी अप्पर पाेलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अहमदपूर येथील उपविभागीय पाेलीस अधिकारी बलराज लंजिले, पाेलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी भेट देऊन पंचनामा केला. सदरची घरफाेडी १७ ते १९ जूनदरम्यान घडली आहे. बंद असलेल्या घरावर नजर ठेवत चाेरट्यांनी घरफाेडी केली असून, फरार चाेरट्यांच्या अटकेसाठी दाेन पाेलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञासह श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले हाेते.