फिरायला जाण्यासाठी अशीही धडपड
बहुतांश अर्जात वैद्यकीय कारण देण्यात आले आहे़ त्यापाठाेपाठ जवळच्या नातेवाईकांचे लग्न, अंत्यविधीचे कारण देण्यात आले आहे़ तर २५ हजार ९६५ जणांचे नाकारण्यात आलेल्या अर्जात अफलातून कारणे देण्यात आली आहेत़ नातेवाईकांची सहज भेट, कारण नसताना प्रवास, याशिवाय, लग्नानंतर फिरायला जाण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे़ तर काहींनी अर्जासाेबत लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तताच केली नसल्याचे आढळून आहे आहे़
बहुतांश अर्जात वैद्यकीय कारण
काेराेनाच्या काळात जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी अनेकांनी ई-पाससाठी आपले अर्ज दाखल केले हाेते़ दरम्यान, यातील अनेकांच्या अर्जात क्षुल्लक कारणांचा उल्लेख आढळून आला आहे़ त्यापाठाेपाठ १२ हजार ४१० जणांच्या अर्जात ९५ टक्के कारण वैद्यकीय असल्याचे समाेर आले आहे़ उर्वरित ५ टक्के अर्जात लग्न, अंत्यविधीचे कारण देण्यात आले आहे़ अत्यावश्यक असलेल्या कारणांना पाेलीस अधीक्षक कार्यालयाने मंजुरी दिली आहे़