उदगीर तालुक्यातील तोंडार येथील पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे अमरावती जिल्ह्यात कार्यरत होते. त्यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यांची ही आत्महत्या नसून एक प्रकारे हत्या आहे. यामुळे शासनाने अनिल मुळे यांच्या आत्महत्येची सीआयडीमार्फत चौकशी करावी. त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी लिंगायत महासंघ शाखा चाकूरच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर लिंगायत महासंघाचे अध्यक्ष सुभाष शंकरे, कार्याध्यक्ष धीरज माकणे, योगीराज स्वामी, गणपत पटणे, डॉ. सिद्धेश्वर शेटकर, ॲड. भीमाशंकर नंदागवळे, शिवकांत सांगावे, शिवहार खरोशे, संगमेश्वर पटणे, चंद्रकांत उस्तुर्गे, बळवंत मदनुरे, विश्वनाथ कस्तुरे, कपिल ढोबळे, बस्वराज पटणे, संदीप माकणे, माधव ढोबळे, दीपक पाटील, महालिंग अक्कानवरू, शंकर मोरगे, सचिन शेटे, दिलीप फुलारी, सागर होळदांडगे आदींची नावे आहेत.
आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST