शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 19:50 IST

महापालिकेची कारवाई : तीन ठिकाणची अनधिकृत दुकाने हटविली

लातूर : वाढलेल्या अतिक्रमणांविरोधात महानगरपालिकेने शनिवारी पहाटे ५ वा़ पासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात छत्रपती शिवाजी चौक, जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता, तहसील कार्यालयानजीकच्या अनधिकृत दुकानांवर मोठ्या पोलीस बंदोबस्तात हातोडा घातला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य चौक आणि रस्ता खुला झाला आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी चौक, परिसर आणि याच चौकातून बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली होती. परिणामी, पादचाऱ्यांसह वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. अतिक्रमणधारकांनी ही अतिक्रमणे स्वत:हून काढून घ्यावीत, अशा वारंवार सूचना महापालिकेने केल्या होत्या. परंतु, अतिक्रमणधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शनिवारी पहाटे ५ वा़ अचानकपणे महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक शिवाजी चौकात दाखल होऊन अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. सकाळी ९ वा़ पर्यंत या परिसरातील संपूर्ण अतिक्रमणे हटविण्यात आली.

यावेळी महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, उपायुक्त हर्षल जाधव, सहाय्यक आयुक्त वसुधा फड, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, शहर पोलीस उपअधीक्षक हिम्मत जाधव आदींची उपस्थिती होती.

मोहीम सुरुच राहणारअतिक्रमणधारकांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे वारंवार आवाहन करण्यात आले होते. परंतु, ही अतिक्रमणे काढण्यात येत नव्हती. त्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात येत असून यापुढे ही मोहीम सुरु राहणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त हर्षल जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Latur policeलातूर पोलीसlaturलातूर