राज्य शासनाने गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू विक्रीस प्रतिबंध केला आहे. मात्र, अहमदपूर येथील नांदुरा रस्त्यावरून मोटारसायकलवरून (क्र. एमएच १२ सीएम ४५१०) विविध प्रकारच्या गुटख्याची पोत्यातून वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संशयित वाहन पकडले. यावेळी दुचाकीवरील पोत्यात ३६ हजार ७१० रुपयांचा गुटखा आढळून आला. गुटखा आणि ४० हजारांची दुचाकी जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा ७६ हजार ७१० रुपयांचा आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांच्या फिर्यादीवरुन अहमदपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रहिम मोईन शेख (रा. अहमदपूर) याच्याविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.
दुचाकीसह ३६ हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST