पाेलिसांनी सांगितले, देवणी येथील निलंगा राेडवर असलेल्या एका दुकानात माेठ्या प्रमाणावर गुटखासदृश वस्तू, सुगंधित सुपारी आणि इतर वस्तूंची माेठ्या प्रमाणावर विक्री हाेत असल्याची माहिती लातूर येथील अन्न व औषध प्रशासनाचे अन्न व सुरक्षा अधिकारी दयानंद विठ्ठलराव पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे सदर दुकानावर पथकाने मंगळवारी दुपारच्या सुमारास छापा मारला. यावेळी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तथा आराेग्यासाठी हानिकारक असलेल्या सुगंधित पानमसाला आणि गुटखा या मालाची विक्री हाेत असल्याचे समजून आले. यावेळी दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला प्रतिबंधित सुगंधित मसाला, तंबाखू, इतर गुटखासदृश वस्तू असा एकूण २२ हजार ८२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत देवणी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दुकानमालक महादेव काशीनाथ मिटकरी याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने मिटकरी यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पाेलीस हेड काॅन्स्टेबल विनायक कांबळे करीत आहेत.
देवणी येथे गुटख्याच्या दुकानावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST