यावेळी श्री शंकरलिंग शिवाचार्य स्वामी, शैलेश पाटील चाकूरकर, पंडितराव धुमाळ, राधा बिराजदार, हालप्पा कोकणे, राजकुमार चिंचनसुरे, बजरंग जाधव, बसवराज वलांडे, डॉ. राघवेंद्र कस्तुरे, देवेंद्र कोराळे, शरणप्पा मुळे, गुलाब धर्मगुत्ते, बाबूराव इंडे, काशीनाथ शाहू, ओमकार स्वामी, वीरेश चिंचनसुरे, बसवराज पाटील, परमेश्वर कारभारी, शिवशरण पाटील आदी उपस्थित होते.
...
उदगीर- कंधार बस पूर्ववत सुरू करावी
जळकोट : उदगीर आगाराची उदगीर- कंधार ही बस अचानक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत आहे. २० वर्षांपासून ही बस सुरू होती. अचानक ती बंद करण्यात आल्याने उमरदरा, हाडोळी, उमरगा, होकर्णा, वांजरवाडा, जळकोट, पाटोदा, कोळनूर, तिरुका या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बस पूर्ववत सुरू करावी आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
...
बेलकुंड येथे फळबाग लागवडीस प्रारंभ
औसा : मनरेगाअंतर्गत तालुक्यातील बेलकुंड येथील शेतकरी पोपट पवार यांच्या शेतात फळबाग लागवडीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, तालुका सरचिटणीस संजय कुलकर्णी, कृषी पर्यवेक्षक विकास लटुरे, आशिष काळदाते, माजी जि.प. सदस्य राजेंद्र पाटील, राजेंद्र माने, राजकिरण साठे, युवराज गोरे, गजेंद्र डोलारे, सरपंच विष्णू कोळी, उपसरपंच सचिन पवार, समाधान कांबळे, अजिंक्य अपसिंगेकर आदी उपस्थित होते.
...
नेकनाळ येथे वृक्षारोपण उपक्रम
लातूर : गुरुपौर्णिमेनिमित्त नेकनाळ येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात शंभर रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी देवणी पंचायत समितीचे उपसभापती शंकरराव पाटील तळेगावकर, काशीनाथ गरिबे, सरपंच कलावती कोरे, मुख्याध्यापक सुभाष म्हेत्रे, ग्रामसेवक ईश्वर मुर्के, महादेव बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर बिरादार सायगावकर, सचिव गोपीनाथ बोरोळे, अंगणवाडी सेविका रतनाबाई कोरे आदींची उपस्थित होती.
...