अध्यक्षस्थानी परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर वाघमारे होते. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भाऊराव यादव, नायब तहसीलदार श्रावण उगले, माळी सेवा संघाचे राज्य सरचिटणीस भारत काळे, अनिताताई फुटाणे, केशव यादव पाटील, सन्मान सोहळा समितीचे अध्यक्ष पापासाहेब यादव आदी उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी व प्रतीक फुटाणे १३ दिवसांत ७ हजार ८२० किमी प्रवास केल्याने त्याचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक कमलाकर वाघमारे यांनी केले, सूत्रसंचालन भागवत पवळे यांनी केले, तर आभार तुळशीदास गोंदरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रकाश नालवंडीकर, बालाजी माळी, सुरेंद्र तिडके, नितीन यादव, शरद तिडके, जगन्नाथ राऊत यांनी परिश्रम घेतले.
मुलांनी नवीन करिअर निवडावे...
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भाऊराव यादव म्हणाले, सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. बहुतांश विद्यार्थी ठराविक क्षेत्र निवडतात. मात्र, इतर क्षेत्रातही विविध संधी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवनवीन करिअरचा पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे. तसेच मुलांनी आपले ध्येय निश्चित ठेवून जिद्दीने अभ्यास करावा. त्यामुळे निश्चित यश मिळते.