तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालयाचे यश
लातूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारा जेईई मेन परीक्षा घेण्यात आली. तुळजाभवानी महाविद्यालयाने यश मिळविले आहे. यामध्ये
कृष्णा पेन्सलवार, श्रीनिवास वांगे, रामभाऊ डुकरे,शिवप्रसाद गंदगे, ज्योतिरादित्य पांचाळ, कृष्णा बजाज, सय्यद अजिमउल्ला यांचा समावेश आहे. गुणवंतांचे पालकमंत्री अमित देशमुख, आ. विक्रम काळे, उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर मोरे, बोर्डाचे चेअरमन व्ही. के. खांडके, सचिव सुधाकर तेलंग, संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्राचार्य एस. डी. केंद्रे, कविता केंद्रे आदींनी कौतुक केले.
सीआरपीएफ कॅम्प येथे महिला दिन साजरा
लातूर : येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा निलंगेकर, सीआरपीएफचे संजीवकुमार वशिष्ठ, विमी वशिष्ठ, राजेशकुमार सिंग, डॉ. निकिता नायडू, अनिता चौधरी, डॉ. अमृता कारंडे, नेहा सिंग आदींसह शिवाई प्रतिष्ठानच्या सदस्यांची उपस्थिती होती.
रेणापूर नाका परिसरात सुविधांचा अभाव
लातूर : शहरातील रेणापूर नाका परिसरात सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणी नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. परिणामी, मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहर महापालिकेने याकडे लक्ष देऊन तत्काळ घंटागाडी सुरू करून, सुविधा पुरवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
उन्हाचा पारा वाढल्याने कुलरला मागणी
लातूर : जिल्ह्याचे तापमान ३५ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे उकाडा वाढला असून, लातूर शहरात विविध भागात कुलर विक्रीसाठी दाखल झाले आहेत. गंजगोलाई, महात्मा गांधी चौक परिसरातील दुकाने, रेणापूर नाका तसेच औसा रोडवरील अनेक दुकानात कुलर विक्रीसाठी आले असल्याचे चित्र आहे. यासोबतच कुलर दुरुस्तीची कामेही सुरू असून, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात कुलरला अधिक मागणी होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव
लातूर : जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये एसबीआय बॅँक उपव्यवस्थापिका अंबिका पाटील, आयटीआय प्राचार्य मनीषा बोरुळकर, पी.एस.आय. वर्षाराणी अजले यांचा समावेश होता. यावेळी अभियंता गीता ठोंबरे, संपदा दाते, स्मिता अयाचित, रोहिणी मुंढे, नीलिमा अंधोरीकर, रेखा मार्कंडेय, अनुपमा पाटील आदींसह महिलांची उपस्थिती होती.
शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप
लातूर : जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थी तसेच लहान बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जात आहे. जवळपास ४ लाख ५० हजार बालकांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. यासोबतच आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सदरील मोहीम राबविली जात आहे. बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
दयानंद महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
लातूर : शहरातील दयानंद विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वरांजली चौधरी, कृष्णकुमार सोनवणे, स्वरूप गावकरे यांनी यश मिळविले. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य जयप्रकाश दरगड, डॉ. कोमल गोमारे, प्रा. निकिता शिंदे, डॉ. प्रशांत मांनीकर, प्रा. आकांक्षा भांजी, डॉ. चंद्रशेखर स्वामी, प्रा. करुणा कोमटवाड, प्रा. श्वेता मदने आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
काशिनाथ ऐतलवाड यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड
लातूर : अखिल भारतीय शिक्षक जनता दलाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी काशिनाथ सदाशिव ऐतलवाड यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष के.जे. शिंदे यांनी ही निवड केली असून, या निवडीबद्दल कार्याध्यक्ष विकास शिंदे कोनाळीकर, प्रा. शिल्पाताई शिंदे, एकनाथ मसुरे, प्रा. कुलकर्णी, प्रा. डी.एस. वाडकर, प्रा. प्रभाकर, प्रा. कवडगावे, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. डी. आर. पाटील, प्रा. शिंदे, आदींसह अखिल भारतीय जनता दलाच्या सदस्यांनी कौतुक केले आहे.
ग्रामीण भागात मुलांची आरोग्य तपासणी
लातूर : लातूर ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आठ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक शाळेला भेट देऊन तपासणी केली जात असून, पुढील आठवडाभरात सर्वच शाळातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचीही तपासणी केली जात आहे.
विनामाक फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
लातुर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याअनुषंगाने लातूर शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर शहर महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातील गंजगोलाइ, दयानंद गेट परिसर, पाण्याची टाकी, रेणापूर नाका, औसा रोड आदी भागात पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नागरिकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.