किनगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच किशोर मुंडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. केंद्रेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयातही अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच ज्योती माधव केंद्रे, सहशिक्षक माधव केंद्रे, उपसरपंच ज्योती बालाजी केंद्रे, बालाजी केंद्रे, चेअरमन शिवहार केंद्रे, भानुदास गुरुजी, पोलीसपाटील चंद्रकांत केंद्रे, श्रीराम केंद्रे, विश्वास केंद्रे, भानुदास केंद्रे, बाळू केंद्रे, शिवाजी केंद्रे, नागनाथ केंद्रे, ह. भ. प. धनंजय महाराज केंद्रे, भालचंद केंद्रे, सुधाकर केंद्रे, गजेंद्र केंद्रे, आदी उपस्थित होते. मोळवण येथेही लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना ग्रामस्थांकडून अभिवादन करण्यात आले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST