शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

अहमदपुरात कंटेनरखाली चिरडून आजी, नातवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST

अहमदपूर (जि. लातूर) : स्कुटीवरून जात असलेल्या आजी व नातवाला भरधाव वेगातील कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे स्कुटीवरील ...

अहमदपूर (जि. लातूर) : स्कुटीवरून जात असलेल्या आजी व नातवाला भरधाव वेगातील कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे स्कुटीवरील दोघेही खाली पडल्याने कंटेनरखाली चिरडले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्यासुमारास अहमदपुरातील थोडगा रस्त्यावर घडली.

कमलबाई शिवराज गोरे (वय ८०) व योगेश जयराज गोरे (२५) असे मृत आजी व नातवाचे नाव आहे. अहमदपुरातील थोडगा रोडवरुन सोमवारी सकाळी ११.३०च्या सुमारास योगेश गोरे व आजी कमलबाई गोरे हे दोघे स्कुटी (एमएच १२, एलके ४२२२) वरुन रुग्णालयात जात होते. तेव्हा थोडगा गावाकडून अहमदपूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर (एमएच ०४, एफएफ ७२६७) ने स्कुटीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडून कंटेनरच्या पाठीमागील टायरखाली चिरडले आणि त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी अक्षरश: रक्ताचा सडा आणि शरीराचे तुकडे पडले होते. हा अपघात घडल्यानंतर कंटेनरचालक फरार झाला. अहमदपूर पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला. अधिक तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार करत आहेत. मृत आजी व नातवावर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे उपस्थितांचे हृदय हेलावले.

वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर...

शहरातील या छोट्या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक अवजड वाहने धावत असतात. त्यामुळेच हा अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लॉकडाऊनमुळे योगेश आला होता गावी...

मृत योगेश याचे शिक्षण पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये झाले होते. त्याने २०२० मध्ये पदवी प्राप्त केली हाेती. सध्या तो नोकरीच्या शोधात होता. लॉकडाऊनमुळे तो गावी आला होता, असे नातेवाईकांनी सांगितले. तसेच योगेशच्या आईचा २०१४ मध्ये अपघातात मृत्यू झाला होता. त्याही कंटेनरखाली चिरडून मृत झाल्या होत्या.

धक्क्याने वडिलांची प्रकृती खालावली...

योगेश हा एकुलता एक होता. त्याचे वडील जयराज गोरे यांचे इलेक्ट्रिकचे दुकान असून, ते सोमवारी दुकानात होते. या अपघाताची माहिती कळताच त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. योगेशची बहीण जपानमध्ये राहते.

सोबत पासपोर्ट फोटो

१. २८ एलएचपी कमलबाई गोरे

२. २८ एलएचपी योगेश गोरे