शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आशांच्या प्रोत्साहनपर भत्त्याचा ग्रामसेवकांना विसर; सीईओंच्या पत्राला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 19:12 IST

कोरोना काळात आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता गावस्तरावर आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक सर्वेक्षणाचे काम करत आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी आशा व गटप्रवर्तकांना मासिक १ हजार प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे आदेश मे महिन्यात काढले.जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी अद्याप छदामही दिली नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

- आशपाक पठाणलातूर : गावस्तरावर कोरोना सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना ग्रामनिधी, वित्त आयोगातून मासिक १ हजार रूपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी काढले होते. मात्र, अद्याप बोटावर मोजण्याइतक्याही ग्रामपंचायतींनी हा भत्ता दिलेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्राला ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखवली आहे.

कोरोना काळात आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता गावस्तरावर आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक सर्वेक्षणाचे काम करत आहेत. त्यांना शासनाकडून मिळणारा मोबदला मासिक केवळ १ हजार रूपये आहे. यातून त्यांना दैनंदिन रोजगार केवळ ३५ रूपये पडत होता. तरीही जीवाची पर्वा न करता आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी सर्व जोखीम पत्करून काम सुरूच ठेवले. अत्यंत तोकडा मोबदला असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी आशा व गटप्रवर्तकांना मासिक १ हजार प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे आदेश मे महिन्यात काढले. त्यामुळे आशा स्वंयसेवकांनी उत्स्फूर्तपणे जोमाने काम सुरू केले. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी अद्याप छदामही दिली नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. जीवाची पर्वा न करता गावाची काळजी घेणाऱ्या आशांची यामुळे परवड होत आहे.

पत्र दाखवूनही कोणी दखल घेईना...महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार कोरोना महामारीच्या काळात संबंधित आरोग्यविषयक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मदत करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी ठरते. त्यामुळे प्रोत्साहनपर भत्ता म्हणून मासिक १ हजार द्यावेत, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी काढले. ही भत्त्याची रक्कम मिळावी, यासाठी आशा स्वंयसेविका, गटप्रवर्तकांनी ग्रामसेवकांना आदेशाची प्रतही दाखवली. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे आशांकडून सांगण्यात येत आहे.

सीईओ कारवाई करतील का?लातूर जिल्ह्यात एकूण १,८९५ आशा व ८८ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांनी प्रोत्साहनपर भत्त्यासाठी ग्रामसेवकांना वेळोवेळी आठवण करून देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी काढलेल्या पत्राला ग्रामसेवक दाद देत नाहीत. त्यामुळे पत्राकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :laturलातूरMONEYपैसाcorona virusकोरोना वायरस बातम्या