पानगाव येथे ७० निराधारांना कपडे वाटप व विविध क्षेत्रांतील ११ जणांना आदर्श नागरिक पुरस्कार, आरोग्य शिबिरप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य सोमनाथ रोडे होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर बद्दर, ॲड. दशरथ सरवदे, मुनीर अहमदभाई शेख, पोउपनि. राजकुमार गुळभेले, सूर्यकांत चव्हाण, तलाठी कमलाकर तिडके, ग्रामविकास अधिकारी गोपीनाथ टकले आदींची उपस्थिती होती. सूर्यकांत चव्हाणलिखित ‘ध्यासपर्व’ व विशाल कांबळेलिखित ‘टक्कर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पेरे पाटील म्हणाले, या जगात दोनच व्यक्ती इमानदारीने काम करतात. त्या म्हणजे कुटुंबातील महिला आणि सीमेवरील सैनिक होय. त्यामुळे माजी सैनिकांना निवडणुकीविना ग्रामपंचायतचे सदस्य करा, अशी मागणी सरकारकडे राहणार असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी पानगाव कृती विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.