शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या इमारती खिळखिळ्या; भिंती, छताकडे पाहत गावचा कारभार!

By हरी मोकाशे | Updated: August 23, 2023 17:48 IST

नवीन इमारतींसाठी पदाधिकाऱ्यांची धावाधाव

लातूर : प्रत्येक गावचा आत्मा ही ग्रामपंचायत असते. त्यामुळे विविध कामानिमित्ताने गावातील नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, जिल्ह्यातील १७२ गावांतील ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण होऊन त्या मोडकळीस आल्या आहेत. परिणामी, गाव कारभाऱ्यांना खिळखिळ्या इमारतींच्या भिंती अन् छताकडे पाहत गावचा कारभार हाकावा लागत आहे.

गावासह वाडी- वस्ती, तांड्यांच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही केंद्रबिंदू आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासाची ध्येय- धोरणे ठरविली जातात. गावातील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायतींद्वारे होते. प्रत्येक ग्रामपंचायत ही अधिक सक्षम व्हावी म्हणून शासनाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक गावांच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून १५ व्या वित्त आयोगातून कोट्यवधीचा निधी हा थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत आहे. मात्र, जिल्ह्यातील ४४ गावांत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांना बसण्यासाठी ग्रामपंचायतीस इमारत नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील १७२ ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे तिथे बसण्यास गाव कारभाऱ्यांचा जीव धजावत नाही.

४४ गावांमध्ये ग्रामपंचायतीसाठी इमारत नाही...जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १७२ गावांतील ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. तसेच ४४ ग्रामपंचायतींसाठी इमारत नाही. त्यात लातूर- ५, औसा- १०, निलंगा- ९, देवणी- ४, उदगीर- १०, अहमदपूर- ३, चाकूर - २ आणि रेणापूर तालुक्यातील एका गावात ग्रामपंचायतीची इमारत नाही.

इमारतीसाठी पाठपुरावा...गावात ग्रामपंचायतीची इमारत आहे. मात्र, ती फार जुनी आहे. त्यामुळे मोडकळीस आली आहे. काही वेळेस छताचा गिलावा गळत आहे तर भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या इमारतीत बसण्यासाठीही भीती वाटत आहे. नवीन इमारत बांधण्यात यावी म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे, असे सरपंच, उपसरपंचांनी सांगितले.

लवकरच अडचण दूर...आझादी का अमृत महोत्सवनिमित्ताने जिल्ह्यातील ७५ गावांमध्ये ग्रामपंचायतींसाठी नव्या इमारती बांधण्यात येणार आहेत. तसेच १५ व्या वित्त आयोेगातूनही काही इमारती बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रक्रिया पूर्ण अंतिम टप्प्यात आहे. लवकरच अडचण दूर होईल.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

निलंग्यातील सर्वाधिक इमारती जीर्ण...तालुका - ग्रामपंचायती - जीर्ण इमारतीलातूर - १११ - २४औसा - १०९- २६निलंगा - ११६ - २७शिरुर अनं.- ४२ - ०९देवणी - ४५ - ११उदगीर- ८७ - १८जळकोट - ४३ - ०८अहमदपूर - ९७ - १९चाकूर - ७१ - १४रेणापूर - ६५ - १६एकूण - ७८६ - १७२

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतlaturलातूर