तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोत्कृष्ट गायक स्वरसम्राट पद्मश्री मोहम्मद रफी यांनी आपल्या गीताच्या माध्यमातून प्रेम, शांती, सद्भावना व राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी सांस्कृतिक व कलेच्या क्षेत्रातील गानकोकिळा लता मंगेशकर, शहनाईवादक उस्ताद बिस्मिलाखाॅं, सुब्बालक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सरकारने त्यांच्या कार्याचा व कलेचा गौरव केला आहे.
वास्तविक मोहम्मद रफी यांच्यासारखा अष्टपैलू गायक आतापर्यंत झाला नाही. भविष्यात असा गायक होईल, असे वाटत नाही. त्यामुळे त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव करावा.
निवेदनावर साहित्य संगीत कला अकादमीचे अध्यक्ष डाॅ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष सय्यद याखूब, गफारखान पठाण, ॲड. अमोल इरले, गोविंदराव कांबळे, पठाण मोहम्मद, सय्यद नौशाद, शहारूख पठाण, बालाजी पवार, संतोष मुंडे, दस्तगीर शेख, राहुल सूर्यवंशी, रामानंद मुंडे, गौतम गायकवाड, कमलबाई थिट्टे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.